
१९७१ सालच्या २ फेब्रुवारीला इराणमधल्या रामसर या शहरात युनेस्कोच्या नेतृत्वाखाली एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली होती. ही परिषद जगातील पाणथळ जमिनींचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भरवण्यात आली होती. दलदलीच्या जमिनींचं रक्षण करावं आणि त्यामार्फत पक्षी, प्राणी आणि एकूणच जैवविविधतेचं रक्षण करावं, या हेतूने बरीच चर्चा केली गेली. तेव्हापासून २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
त्या परिषदेचं फलित म्हणून जगातील देशोदेशींच्या संरक्षित करण्याच्या पाणथळ स्थळांची यादी करण्यात आली आणि त्या ठिकाणांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या देशांनी घेतली. आज तारखेला जगात २५२१ रामसर साईटस असून त्या खालील २५७, ३१७, ३६७ हेक्टर जमीन संरक्षित केली गेली आहे. त्यापैकी भारतात ८५ रामसर स्थळं असून त्याखालील १३, ५८, ०६८ हेक्टर जमीन संरक्षित आहे.
२०१४ पर्यंत भारतात २६ रामसर स्थळं होती. गेल्या १० वर्षांत त्यांची संख्या ५९ ने वाढून ८५ झाली आहे. भारतात सर्वाधिक स्थळं तामिळनाडूत आहेत. तामिळनाडूत १८, उत्तरप्रदेशात १०, पंजाब-ओडिशात प्रत्येकी ६ अशा क्रमाने ही स्थळं आहेत.
महाराष्ट्रात केवळ ३ स्थळं संरक्षित आहेत. त्यात लोणार सरोवर, नांदूर मधमेश्वर आणि ठाण्याची खाडी या स्थळांचा अंतर्भाव आहे.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.