आम्ही कोण?

आडवा छेद

temple entry

आजही दलितांना सर्रास मंदिर प्रवेश नाहीच?

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधल्या गीधाग्राम गावातल्या पाच दलितांनी पोलिसांच्या बंदोबस्तात शिवमंदिरामध्ये प्रवेश केला. कुणी म्हणेल,...

  • मृदगंधा दीक्षित
  • 02.04.25
  • वाचनवेळ 4 मि.
free speech

सत्तेला विडंबनाचा आरसा दाखवण्याची परंपरा आपण का विसरतोय?

व्यंगाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर होणारी टीका सहन करण्याची परिपक्वता आपल्या राजकारण्यांमध्ये राहिलेली नाही, हे वारंवार सिद्ध...

  • मृदगंधा दीक्षित
  • 31.03.25
  • वाचनवेळ 4 मि.
meat india

भारत शाकाहारी की मांसाहारी?

भारत हा प्रामुख्याने शाकाहारी देश आहे आणि मांसाहार करणं चुकीचं आहे, असं बिंबवण्याचा प्रयत्न अलीकडे...

  • मयूर पटारे
  • 28.03.25
  • वाचनवेळ 3 मि.

कथाबोध

eid

आनंदाची भीक

  • मुकुंद कुलकर्णी
  • 26.03.25
  • वाचनवेळ 3 मि.

गावातला एक भिकारी मेला. एकाच जागेवर, एकाच झाडाखाली ३० वर्षं तो भीक मागत होता. एक दिवस तिथेच मरून पडला. लोक जमा झाले. ‘अरेरे, बिचारा तीस वर्षं भीक मागत मागत अखेर मेला.' असं म्हणत लोक उभे होते. त्या जागेवर, त्या झाडाखाली, भिकाऱ्याने बरंच भंगार जमा केलं होतं. “अरे ते सामान...

काय सांगता?

fact check

एप्रिल फूलच्या दुसऱ्या दिवशी येतो आंतरराष्ट्रीय तथ्य तपासणी दिवस

  • टीम युनिक फीचर्स पोर्टल
  • 02.04.25
  • वाचनवेळ 2 मि.

एप्रिल फूल डे अनेक देशांत लोकप्रिय आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. पण तो साजरा करण्याची पद्धत मात्र सर्वत्र आढळते. या दिवशी आपल्या माणसांची, मित्रांची थट्टा मस्करी करून, छोटं-मोठं खोटं बोलून त्यांना फसवलं...

शोधाशोध

व्हिडीओ

जगभरातले धटिंगण | भाग १ - व्लादिमीर पुतीन

व्लादिमीर पुतीन यांच्या हाती रशियाची सत्ता येऊन २५ वर्षं होतायत. त्यानिमित्ताने लोकशाहीला पायदळी तुडवणाऱ्या जगभरातील धटिंगणांच्या हुकुमशहा होण्याच्या प्रवासाची गोष्ट सांगणारी ही सिरीज घेऊन येत आहोत. हा त्याचा पहिला भाग अर्थात, व्लादिमीर पुतीन. लोकशाहीती

  • 22.03.25

ले

लोकसभा जागांच्या फेरवाटपावरून उत्तर-दक्षिण वादाला तोंड

  • आ. श्री. केतकर
  • 01.04.25
  • वाचनवेळ 6 मि.

भारतात सध्या एक जुनं राजकीय वादळ नव्याने येऊ घातलं आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेची चर्चा आणि त्यावरून होणारे उलटसुलट आरोप-प्रत्यारोप याने सध्या वातावरण तापलं आहे. प्रचलित पद्धतीनुसार, म्हणजे लोकसंख्या आधारभूत मानून फेररचना करण्यास तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी विरोध केला आहे आणि त्यांना दक्षिणेतील सगळ्याच राज्यांचा पाठिंबा आहे.

ही लोकसभा मतदारसंघांची पुनर्ररचना खरं तर २००१ मध्येच होणार होती, परंतु तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ती २५ वर्षं पुढे ढकलली. त्यानुसार ती आता पुढच्या वर्षी, म्हणजे २०२६ मध्ये होणं अपेक्षित आहे. १९५०मध्ये लोकसभेच्या ४८९ जागा होत्या. सध्य़ा त्या ५४३ आहेत. फेररचनेनंतर त्या ७५३ होतील, असा अंदाज आहे....

...पुढे वाचा

कवी जातो तेव्हा...

  • डॉ. समीर कुलकर्णी
  • 27.03.25
  • वाचनवेळ 38 मि.

26-3-2012, सकाळ. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे. पहिला मजला.

आयसीयूच्या बाहेर नेहमीचंच वातावरण. अजून कुणाला काही माहितीय असं दिसत नाहीये. दार उघडून मी आयसीयूच्या आत जातोय.

उजवीकडच्या कोचावर मिथिला बसलेली. गेल्या काही दिवसांतल्या अपार ताणाने ती थकून गेलीय. साहजिकच आहे. ती डॉक्टर. त्यामुळे जे घडतंय ते कळतंय; ते तसं घडू नये अशी मनोमन इच्छा आहे, पण हातात काहीच नाही. केवळ फरफट. जवळच्या माणसाच्या प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा त्याच्या मृत्यूची वाट बघत ताटकळणं अत्यंद क्लेशद. यातना सहन करणारा एकटाच असतो. तो एकटाच जगलेला असतो आणि जाणारही एकटाच असतो, एवढंच सत्य. त्याचं दु:ख वाटून घेणं, त्यात सामील होणं, वेदनांचं ओझं हलकं करणं वगैरे गोष्टी अगदी साफ खोट्या....

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

मुलाखत

विष्णू मनोहर: अमेरिकेत मराठी क्लाऊड किचन्स

विष्णू मनोहर हे मराठी खाद्यपदार्थांचे ग्लोबल ब्रँड अ‍म्बेसॅडर आहेत. जागतिकीकरणानंतर भारतात चिनी, मेक्सिकन, थाई आणि इटालियनसारख्या परदेशी पदार्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. या भाऊगर्दीत पारंपरिक मराठी पदार्थांची चव ठळक करण्याचं काम विष्णू मनोहर करत आहेत. ‘विष्णूजी की रसोई’सारखी उपाहारगृहं, टीव्हीवरचे रेसिपी शोज किंवा ऑनलाइन कार्यक्रमांतून ते मराठी पदार्थांचं ध्रुपद आळवत आहेत. नुकतीच त्यांनी अमेरिकेत मराठी खाद्यपदार्थांची क्लाऊड किचन्स सुरू केली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...


...पुढे वाचा

vishnu manohar
विष्णू मनोहर

माणसाच्या माणूसपणाबद्दल

  • गौरी जानवेकर
  • 01.04.25
  • वाचनवेळ 11 मि.

बऱ्याचदा अशा बातम्या आपल्या वाचण्यात येतात- अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुणा विद्यार्थ्याने अवघड परीक्षा पास केली, किंवा एखाद्या गरीब, पैशांची चणचण असणाऱ्या व्यक्तीने कोणाची तरी सापडलेली मौल्यवान वस्तू परत केली. असं काही वाचलं, की त्या व्यक्तींबद्दल कौतुक आणि आदर तर वाटतोच, पण त्यापलीकडेही मानवी मन नेमकं कसं काम करतं याबद्दल कुतूहल निर्माण होतं.

नेमक्या कोणत्या तत्त्वावर चालतं आपलं मन? मनाच्या अनेक समस्या आणि आजार यांची कारणं, लक्षणं आणि उपाय यावर आपण चर्चा केली. आपल्या आजूबाजूला संतापलेली, चिडलेली, निराश झालेली माणसं दिसतात....

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • प्रथमेश हळंदे
kottukkaali

कोट्टूक्काली : गोष्ट आडमुठ्या पोरीची

दक्षिण भारतात आणि विशेषतः तमिळ संस्कृतीत स्त्रियांच्या मासिक पाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलीची पहिली मासिक पाळी इथे मोठ्या समारंभासारखी साजरी केली जाते. या समारंभाला वेगवेगळी नावं आहेत. त्यापैकी उत्तर तमिळनाडूच्या ग्रामीण भागात प्रचलित असलेलं एक नाव म्हणजे ‘परुवंमडईतल विळ्ळा’. ‘परुवंमडईतल’ म्हणजे तारुण्य, तर ‘विळ्ळा’ म्हणजे...

...पुढे वाचा

अनुभव

  • दीपक नागरगोजे

इवलासा जीव - आभाळाएवढी संवेदना

गेल्या तीन महिन्यांपासून आमच्या ‘शांतीवना’तली दहा वर्षांची मुलगी राधिका ( बदललेलं नाव) कर्करोगाशी झुंज देत आहे. पुण्यातील कर्करोग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला तोंडाच्या कॅन्सरची लागण झाली आहे. तोंडाचा कॅन्सर बीडी, तंबाखू, गुटखा आदी पदार्थांचं सेवन केल्यामुळे होतो, असा सरासरी कयास असतो. पण लहानपणापासून ‘शांतीवना’त वाढलेल्या या चिमुरडीला हे पदार्थ कधी पाहायलाही मिळाले नाहीत. तरीही हे घडलं.

वडिलांचं छत्र हरवल्यानंतर हक्काचं घर म्हणून राधिका ‘शांतिवना’त आणलं गेलं. बडबडी, हुशार आणि चुणचुणीत. एका संकटातून बाहेर निघाली, तर या दुसऱ्या संकटाने तिला गाठलं. तिला कॅन्सरसारख्या आजाराने घेरल्याचं समजल्यावर आम्ही सारे हादरून गेलो. पण फक्त तळमळण्यात काहीही अर्थ नव्हता. लगेचच तिच्यावरती उपचार...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results