ओशो सांगतात,
माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ते पटवून घेऊ नका.
त्यावर श्रद्धा तर बिलकुल ठेवू नका.
फक्त त्यावर विचार करा. तो मात्र नक्की करा.
मग तुम्हाला माझं म्हणणं संपूर्ण चुकीचं वाटू शकेल. तसं झालं तर सोडून द्या.
कदाचित त्यातला काही भाग तुम्हाला योग्य वाटेल. तेवढाच ठेवा. बाकी सगळं सोडून द्या.
मग तो भाग माझा राहणारच नाही, तो तुमचा होऊन जाईल!