ओशो सांगतात,
एकदा दोन बौद्ध भिक्षूंना तुरुंगात डांबलं गेलं होतं. काही वर्षांनी त्यांची सुटका झाली.
बाहेर आल्यावर त्यातल्या एका भिक्षूने दुसऱ्याला विचारलं, “आपल्याला ज्यांनी तुरुंगात डांबलं, त्यांना तू माफ केलंस ना?”
दुसरा म्हणाला, “नाही. मी त्यांना माफ केलेलं नाही आणि कदापि करणार नाही.”
पहिला म्हणाला, “म्हणजे तुला त्यांच्या तुरुंगातून बाहेर पडायचंच नाही तर..”