आम्ही कोण?

आडवा छेद

वीकेंड स्पेशल

डिहार - सैन्यासाठी ‘झटणारी’ संस्था

jai jawan
  • गौरी कानेटकर
  • 17.05.25
  • वाचनवेळ 13 मि.

भारतीय सैन्याला हिमालयातल्या सीमांवर सहन करावं लागणारं खडतर आयुष्य काही प्रमाणात का होईना सुसह्य व्हावं, यासाठी लष्कराची ‘डिहार’ ही संशोधन संस्था काम करते. या संस्थेने गेल्या ५० वर्षांत केलेल्या संशोधनामुळे सैनिकांचं, विशेषतः लडाखमधलं वास्तव्य तर सुकर झालं आहेच, शिवाय लडाखच्या विकासालाही चालना मिळाली आहे. या संस्थेच्या कामाची ओळख करून देणारा लेख ‘अनुभव’ दिवाळी २०१०मध्ये प्रकाशित झाला होता. तो इथे पुनर्प्रकाशित करत आहोत. गेल्या १५ वर्षांत या संस्थेचं काम आणखी पुढे गेलेलं असू शकतं.

...पुढे वाचा

कथाबोध

conclave

माझा दिवा मीच

  • मुकेश माचकर
  • 12.05.25
  • वाचनवेळ 5 मि.

ओशो सांगतात,

बोधिधर्माला एक शिष्य म्हणाला, “प्रभू, सकाळी सकाळी जिव्हेवर बुद्धाचं नाव आलं की किती प्रसन्न वाटतं.”

बोधिधर्म शिसारी आल्यासारखा चेहरा करून म्हणाला, “ते नाव घेतल्यावर नीट खळखळून चूळ भरत जा.”

शिष्य चमकून म्हणाला, “हे काय अजब बोलताय, महाराज?”

बोधिधर्म म्हणाला, “खरं तेच बोलतोय. साधनेमध्ये कधी बुद्ध वाटेत दिसला, तर वाट बदलत जा...

काय सांगता?

peter norman

वंशभेदाचा असाही परिणाम

  • प्रीति छत्रे
  • 16.05.25
  • वाचनवेळ 2 मि.

१९६८ सालचं मेक्सिको सिटी ऑलिंपिक्स. ‘ट्रॅक ॲन्ड फील्ड’ प्रकारात पुरूषांची २०० मी.ची अंतिम फेरी पार पडली. विजेते होते टॉमी स्मिथ (अमेरिका, सुवर्ण), पीटर नॉर्मन (ऑस्ट्रेलिया, रौप्य), जॉन कार्लोस (अमेरिका, कास्य).

यांतले टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस अॅफ्रो-अमेरिकी होते. तर पीटर...

शोधाशोध

व्हिडीओ

जगभरातले धटिंगण | भाग ३ - पॉल कगामे

लोकशाहीला पायदळी तुडवणाऱ्या हुकुमशहांचा प्रवास आम्ही जगभरातले धटिंगण या मालिकेतून तुमच्यासमोर मांडतो आहोत. या मालिकेतील तिसरा भाग आहे रुवांडाच्या पॉल कगामे यांच्याबद्दल. लोकशाहीतील नागरिकांना धोक्याची सूचना देणारी ही सिरीज बघा आणि शेअरही करा.

  • 12.05.25

ले

आधीच मर्कट, तशात ‘युद्ध’ प्याला…

  • रवि आमले
  • 12.05.25
  • वाचनवेळ 7 मि.

संस्कृत सुभाषितकार खूपच दूरदृष्टीचे होते, असे म्हणावे लागेल. कारण त्यांनी फार पूर्वीच आपल्या वृत्तवाहिन्यांच्या ताळतंत्राविषयी भाष्य करून ठेवलेले आहे. ते म्हणतात : ‘मर्कटस्य सुरापानं मध्ये वृश्चिकदंशनम्। तन्मध्ये भूतसंचारो यद्वातद्वा भविष्यति ।।’ अर्थ असा, की आधीच मर्कट. त्यात मद्य प्याला. तशात त्यास विंचू चावला. त्यातच अंगात भूत संचारले. अशा त्या माकडाच्या वर्तनाबद्दल काय बोलणार? तो काहीही बरळणार, धिंगाणाच घालणार. आपल्या वृत्तवाहिन्यांनी आधीच धार्मिक अतिरेकाची मोसंबी-नारिंगी प्राशन केलेली होती. अतिराष्ट्रवादाचा वृश्चिकदंश झालेला होताच. त्यात युद्धखोरीचं भूत अंगात संचारलं. मेंदूत अशी सारी विखारी नशा उतरल्यानंतर कुणाचंही जे काही होईल, तेच या वाहिन्यांतील पत्रकारू-नारूंचं झालं आहे. त्याचा परिणाम आपण गेला आठवडाभर पाहिला.

युद्धाचा ज्वर...

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

मुलाखत

विष्णू मनोहर: अमेरिकेत मराठी क्लाऊड किचन्स

विष्णू मनोहर हे मराठी खाद्यपदार्थांचे ग्लोबल ब्रँड अ‍म्बेसॅडर आहेत. जागतिकीकरणानंतर भारतात चिनी, मेक्सिकन, थाई आणि इटालियनसारख्या परदेशी पदार्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. या भाऊगर्दीत पारंपरिक मराठी पदार्थांची चव ठळक करण्याचं काम विष्णू मनोहर करत आहेत. ‘विष्णूजी की रसोई’सारखी उपाहारगृहं, टीव्हीवरचे रेसिपी शोज किंवा ऑनलाइन कार्यक्रमांतून ते मराठी पदार्थांचं ध्रुपद आळवत आहेत. नुकतीच त्यांनी अमेरिकेत मराठी खाद्यपदार्थांची क्लाऊड किचन्स सुरू केली आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत...


...पुढे वाचा

vishnu manohar
विष्णू मनोहर

ॲमेझॉन चालवणारी माणसं

  • तुषार कलबुर्गी
  • 14.05.25
  • वाचनवेळ 21 मि.

“मी नेहमीप्रमाणे पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी एका घरी पोहोचलो. एका माणसाने दरवाजा उघडला. मी म्हटलं, ‘तुमचं पार्सल आलंय.’ तर तो माणूस माझ्यावरच डाफरून म्हणाला, ‘नाही मागवलं कोणी पार्सल इथं. जा घेऊन परत. आणि परत इथं आला तर तंगडं तोडीन.’ मी पत्ता चेक केला तर तोच होता. मला कळेना, हा माझ्यावर का चिडतोय! माझा संताप झाला. पण कस्टमर काहीही बोलला तरी त्याच्याशी नीटच वागायचं, ही आम्हाला वरून मिळालेली सूचना. त्यामुळे राग गिळण्याशिवाय इलाज नव्हता. मी पार्सलवरच्या नंबरला फोन लावला. कुणीच उचलला नाही....

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • निळू दामले
conclave

कॉनक्लेव - पोप निवडीची गोष्ट

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २६७ व्या पोपची निवड प्रक्रिया सुरू होती तेव्हा दोन चित्रपटांची आठवण झाली. २०१९ सालचा टू पोप्स आणि २०२४ सालचा कॉनक्लेव. दोन्ही चित्रपटांचा विषय पोपची निवड हाच होता.

कॉनक्लेव या ताज्या चित्रपटातील मुख्य किरदार आहे कार्डिनल थॉमस लॉरेन्स. चित्रपट सुरू होताना एक बिशप...

...पुढे वाचा

अनुभव

  • कविता नवरे

रॉक बॅलन्सिंग वर्कशॉप

गौतम वैष्णव रॉक बॅलन्सिंग वर्कशॉप घेतोय असं कळलं आणि मी ती संधी वाया जाऊ न द्यायचं ठरवून नाव नोंदवलं. रॉक बॅलन्सिंग म्हणजे लहान-मोठे दगड एकावर एक रचून साधलेला बॅलन्स.

आधी थोडंसं गौतमबद्दल. हा अवलिया कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये दगड बॅलन्स करता करता mindfulness चे धडे देतो. तो शाळांमध्येही वर्कशॉप घेतो. एकाग्रता वाढवण्यासाठी दगड कसे मदत करतात ते विद्यार्थ्यांना समजावतो. आत्तापर्यंत सहा हजारांहून अधिक लोकांना त्याने ही कला शिकवली आहे.

मुळात रॉक बॅलन्सिंग असं काही असतं आणि त्याचं वर्कशॉप घेतलं जातं हेच मला योगायोगाने समजलं.

आपण लहानपणी लगोरी खेळायचो, ते आठवतंय? ते देखील एक प्रकारचं रॉक बॅलन्सिंगच. पण तिथे एक उतरंड होती. आता जो...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results