आम्ही कोण?
काय सांगता!  

मोरयार गुड्डा - २५०० वर्षांपूर्वीचं आश्चर्य

  • प्रीति छत्रे
  • 02.09.25
  • वाचनवेळ 2 मि.
moryar gudda

कर्नाटकात हंपीपासून चाळीस-एक किमी अंतरावर ‘हिरी बेनकल’ म्हणून एक ठिकाण आहे. तिथल्या एका टेकडीवर प्रागैतिहासिक काळातली अनेक दगडी बांधकामं बघायला मिळतात.

ही बांधकामं म्हणजे घरं किंवा गुहांसारखी आहेत. दोन किंवा तीन मोठाल्या दगडी लाद्या एकमेकांना टेकवून उभ्या केलेल्या, आणि त्यावर छप्पर म्हणून आणखी एक तशीच लादी, अशा या रचना आहेत. त्याहून आश्चर्याची गोष्ट, म्हणजे या रचनांची उंची अगदी कमी आहे. ते बघून कुणालाही परिकथेतल्या बुटक्यांच्या गावाची आठवण येईल.

त्या परिसरात ही टेकडी ‘मोरयार गुड्डा’ (शब्दश: अर्थ - बुटक्यांची टेकडी) या नावानेच ओळखली जाते.

या टेकडीवर अशी एक हजाराहून अधिक घरं दिसतात. या रचनांचा पुरातत्व अभ्यास झालेला आहे. ही घरं २५०० वर्षांपेक्षाही जुनी असल्याचं सांगितलं जातं. यातल्या अनेक घरांच्या आतल्या बाजूने दगडांवर तत्कालीन पद्धतीची गुहाचित्रं काढलेली दिसतात. त्यात शस्त्र परजणारे घोडेस्वार, शिकारी, तसंच हरीण, मोर, आणि इतर काही प्राण्यांची चित्रं आहेत.

काही इतिहास अभ्यासकांच्या मते ही त्या काळातली दफनभूमी असू शकते. ही जागा पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. त्यामुळे या रचनांमागे काही खगोलशास्त्रीय संबंध असल्याची शक्यताही वर्तवली गेली आहे. स्थानिकांमध्ये या घरांबद्दल अनेक आख्यायिका आहेत.

गेल्या काही वर्षांत यांतल्या काही रचनांची मोडतोड झाली आहे. तसंच रानटी वनस्पतींमुळेही काही रचनांचं नुकसान झालं आहे. या जागेची देखरेख व्हायला हवी, त्याचं पुरातत्व मूल्य जपलं जायला हवं, असं अभ्यासकांना वाटतं.

Key highlights- Hiri Benakal, near Hampi in Karnataka, is an ancient site with over a thousand small, house-like megalithic structures, known locally as 'Moryar Gudda' or 'Hill of the Dwarfs.' Dating back 2,500 years, these structures are likely burial grounds and contain prehistoric rock art. Experts are concerned about their preservation due to vandalism and natural overgrowth.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Satish Ananda wakase 02.09.25
Khup prachin mahiti dilat...khup khup abhar...ek naw itihasach pan ulgdun dakhwlt .aplya ya dhadpadis manapsun salam

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results