आम्ही कोण?
काय सांगता!  

एट थाऊजंडर हिमशिखरांच्या संख्येत वाढ?

  • गौरी कानेटकर
  • 22.05.25
  • वाचनवेळ 2 मि.
eight thousanders

जगात ८००० मीटरहून अधिक उंच असलेल्या पर्वतांना विशेष महत्त्व आहे. गिर्यारोहणाच्या भाषेत त्यांना एट थाउजंडर्स म्हटलं जातं. एव्हरेस्ट हे त्यातलं सर्वोच्च.

जगात एकूण १४ एट थाउजंडर्स आहेत. त्यापैकी अनेक नेपाळ-चीन, नेपाळ-भारत आणि पाक व्याप्त काश्मीर-चीन यांच्या सीमेवर आहेत. त्यामुळे काही शिखरांवर दोन्ही देश आपला हक्क सांगतात. सर्वाधिक एट थाउजंडर्स नेपाळमध्ये असल्याने साहजिकच जगभरातील गिर्यारोहकांचा ओढा नेपाळमध्ये आहे. नेपाळची अर्थव्यवस्थाच या एट थाउंजंडर्सच्या गिर्यारोहण पर्यटनावर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे ८००० मीटरपेक्षा उंच असलेल्या आणखी सहा शिखरांची नोंद झाल्याचा दावा नेपाळने नुकताच केला आहे. यापैकी चार कांचनजुंगा पर्वतरांगामध्ये आहेत, तर दोन ल्होत्से पर्वतरागांमध्ये आहेत, असं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे.

अर्थात इंटरनॅशनल माउंटेनिअरिंग अँड क्लायंबिंग फेडरेशनने मान्यता दिल्यानंतरच या सहा शिखरांचा अधिकृत यादीत समावेश होऊ शकतो.

 त्यामुळे सध्या तरी एट थाउजंडर शिखरांची यादी ही अशी आहे.

1. एव्हरेस्ट (नेपाळ)

2. ल्होत्से (नेपाळ)

3. अन्नपूर्णा (नेपाळ)

4. मकालू (नेपाळ)

5. मनास्लू (नेपाळ)

6. धौलागिरी (नेपाळ-चीन सीमेवर)

7. चोयू (नेपाळ-चीन सीमेवर)

8. कांचनजुंगा (नेपाळ-भारत सीमेवर)

9. नंगा पर्बत (पाक व्याप्त काश्मीर)

10. के टू (पाक व्याप्त काश्मीर आणि चीन सीमेवर)

11. ब्रॉड पीक (पाक व्याप्त काश्मीर आणि चीन सीमेवर)

12. गेशरब्रम-१ (पाक व्याप्त काश्मीर आणि चीन सीमेवर)

13. गेशरब्रम-२ (पाक व्याप्त काश्मीर आणि चीन सीमेवर)

14. शिशापंग्मा (चीन व्याप्त तिबेट)

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results